Chinchwad : आरोग्य कर्मचा-यांना उन्हाळी टोप्यांचे वाटप

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब पिंपरी-चिंचवड यांच्यातर्फे महापालिकेच्या आरोग्य कर्मचा-यांचे उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी दोन हजार टोप्यांचे वाटप करण्यात आले.

चिंचवड येथील के.एस.बी.चौकत गुरुवारी (दि. 9) टोप्यांचे वाटप करण्यात आले. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, रोटरी क्लब पिंपरीचे अध्यक्ष नितीन ढमाले, माजी अध्यक्ष सदानंद नाईक, रोटरी क्लब चिंचवड मोरयाचे माजी अध्यक्ष विनायक घोरपडे, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे तसेच सहाय्यक आरोग्याधिकारी, मुख्य आरोग्य निरिक्षक, आरोग्य निरिक्षक व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

नितीन ढमाले यांनी रोटरी क्लबचे वतीने सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात येणा-या विविध उपक्रमाची माहिती दिली. शहर स्वच्छतेमध्ये महत्वाची भूमिका बजाविणा-या कामगारांचे कौतुक केले. स्वच्छतेच्या कामात महापालिकेस सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

आरोग्य कर्मचारी हे स्वच्छता दूत असून त्यांनी काम करताना सुरक्षा साधनांचा वापर करावा. कामाच्या हद्दीतील नागरिकांशी निरंतर संवाद साधून ओला, सुका व घरगुती घातक कचरा अलगीकरणाबाबत प्रबोधन करण्याच्या सूचना दिलीप गावडे यांनी दिल्या. डॉ. अनिल रॉय यांनी सामाजिक उपक्रमात रोटरी क्लबचे वेळोवेळी सहकार्य मिळत असल्याचे नमूद करून आरोग्य कर्मचा-यांनी त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्याबाबत सूचना दिल्या. सहाय्यक आरोग्याधिकारी महादेव शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.