Chinchwad Crime News: वाकडची सुरज चौधरी टोळी, चाकणमधील संदीप शिंदे टोळीवर ‘मोक्का’

एमपीसी न्यूज – वाकड परिसरात संघटितरित्या टोळी करून परिसरात दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार सुरज चौधरी आणि चाकण परिसरात टोळी करून दहशत निर्माण करणारा सराईत आरोपी संदीप शिंदे टोळीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे.

टोळी प्रमुख सुरज दयाराम चौधरी (वय 27, रा. काळेवाडी), राजू रामकिशन ठाकूर (वय 25, रा. थेरगाव), रसल रामप्रवेश गौंड (वय 18, रा. काळेवाडी) शंकर दयाराम परदेशी (वय 26, रा. काळेवाडी), राम अनिल आवळे (वय 26, रा. काळेवाडी), नितीन भोसले (रा. काळेवाडी) या टोळीवर पिंपरी, सांगवी आणि वाकड पोलीस ठाण्यात 11 गुन्हे दाखल आहेत.

त्यात घातक शस्त्रांचा धाक दाखवून दरोडा टाकणे, घरफोडी, दुखापत, खंडणी, बेकायदेशीर जमाव जमवून गंभीर दुखापत, नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणे आणि बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणे या गुन्ह्यांचा समावेश आहे. या टोळीवर 31 मार्च रोजी मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी आदेश दिले आहेत.

_MPC_DIR_MPU_II

चाकण येथील टोळी प्रमुख संदीप अरुण शिंदे (वय 42, रा. चाकण), ओंकार मनोज बिसणारे (वय 20, रा. चाकण), निखिल उर्फ दाद्या रतन कांबळे (वय 20, रा. चाकण), नामदेव प्रकाश नाईक (वय 20, रा. चाकण), हर्षद संदीप शिंदे (वय 22, रा. चाकण) आणि सहा अल्पवयीन मुलांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.

या टोळीच्या विरोधात खुनाचा प्रयत्न, दुखापत, सरकारी नोकरास मारहाण, गर्दी-मारामारी, दरोड्याची तयारी, वाहनांची जाळपोळ, बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणे असे 20 गंभीर गुन्हे चाकण आणि भोसरी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. या टोळीची दहशत चाकण परिसरात वाढत असल्याने मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी 31 मार्च रोजी दिले आहेत.

यावर्षी तीन महिन्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शहरातील 11 गुन्हेगारी टोळ्यांमधील 75 सराईत गुन्हेगारांवर मोक्काची कारवाई केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.