Chinchwad : सुरश्री संगीत साधक संस्थेतर्फे रंगला निवृत्ती धाबेकर गुरुजी यांचा गुरुपूजन सोहळा

एमपीसी न्यूज- सुरश्री संगीत साधक संस्था आणि श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानतर्फे नुकताच संगीत अलंकार निवृत्ती धाबेकर गुरुजी यांच्या गुरुपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम श्री स्वामी समर्थ विरंगुळा केंद्र शिवतेजनगर येथे पार पडला.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गायन सादर केले. त्यानंतर धाबेकर गुरुजी यांच्या गायनाचा कार्यक्रम झाला. यामध्ये त्यांनी राग बिहाग सादर केला. तू सप्तसूर माझे, घेई छंद मकरंदहे नाट्यगीत तर कृपाळू सज्जन तुम्ही संतजन ही भैरवी सादर केली. त्यांना तबल्यावर संतोष साळवे यांनी साथसंगत केली.

यावेळी प्रसिद्ध उद्योजक विजय मुळीक,प्रा.हरिनारायण शेळके, पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, माउली ईटकर, नारायण जगताप, दिगंबर राणे, राजेंद पगारे, यशवंत मेस्त्री, प्रकाश बापर्डेकर, भाऊसाहेब सोलत, भगवंत वलोकर, दत्तात्रय गायकवाड, रवी साकोरे, रवींद्र दोडे, मंगेश पाटील, वादक- श्री अरुण बोनकर, अजित घोरपडे, मनोहर चोधरी, तुषार दोडे यांच्यासह सुमारे दीडशे साधक उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन नरेंद्र गायकवाड यांनी केले.

HB_POST_END_FTR-A2
You might also like