Chinchwad : कृषी पर्यटनातून शाश्वत विकास ही काळाची गरज – पांडुरंग तावरे

एमपीसी न्यूज – कृषी पर्यटन हे (Chinchwad) सर्व शेतकरी वर्गासाठी एक नाविन्यपूर्ण संधी असून शाश्वत आर्थिक आणि भौगोलिक विकासासाठी तो उत्तम पर्याय आहे. ज्यामुळे गावातील सर्व स्तरातील लोकांना उपजीविकेचे उत्तम साधन मिळू शकते. कृषी पर्यटनातून शाश्वत विकास ही काळाची गरज असे मत भारतातील कृषी पर्यटनाचे जनक व आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त पर्यटन तज्ज्ञ पांडुरंग तावरे यांनी व्यक्त केले.

नोव्हेल ग्रुपच्या एनआयबीआर कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मध्ये 43 वा जागतिक पर्यटन दिन अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. नोवेल ग्रूपचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वैभव फंड उपस्थित होते.

पांडुरंग तावरे म्हणाले की, युनायटेड नेशन्स जागतिक पर्यटन परिषदेने ठरवलेली या वर्षीची मुख्य संकल्पना ‘पर्यटन आणि हरित गुंतवणूक’ ही प्रामुख्याने ‘पीपल, प्लॅनेट आणि प्रॉस्परिटी’ ह्या तीन मुद्द्यांवर भर देणारी आहे. त्या माध्यमातून सर्व देशांना अधिकाधिक मार्गांनी हरित गुंतवणूक करण्याचे आवाहन परिषदेने केले आहे.

आज भारतात पर्यटन क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची नितांत गरज आहे. पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिक विकास साधत असताना आपण सर्वांनी पृथ्वीवर असणाऱ्या सर्व नैसर्गिक संसाधनांचा जबाबदारीने व जपून वापर केला पाहिजे. तसेच सातत्याने हरित गुंतवणूक करत राहिले पाहिजे, अन्यथा आपण आपल्या पुढील पिढ्यांकरिता खूप मोठे संकट उभे करु. हे दोन्ही घटक जर साध्य झाले तरच आपल्याला आर्थिक आणि अधिक महत्वाची पर्यावरणाची समृद्धी प्राप्त करता येईल.

MPC News Online Bappa : ‘एमपीसी न्यूज’ ऑनलाइन बाप्पा उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद (भाग शेवटचा)

नोवेल ग्रूपचे संस्थापक अध्यक्ष गोरखे यांनी सर्वांना जागतिक पर्यटन दिनाच्या (Chinchwad) शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. फंड यांनी विद्यार्थ्यांना शाश्वत पर्यटनाची गरज या विषयावर मार्गदर्शन केले.

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील आर्दश गाव हिवरे बाजार या विषयावर एक सुंदर नाट्यछटा सादर केली, तसेच त्या गावाची प्रतिकृती बनवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतशृता तांदळे, तानिया श्रॉफ आणि कुणाल श्रॉफ यांनी केले, तर कौस्तुभ टिळेकर याने उपस्थितांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.