Chinchwad : स्वायत्त श्रमिक महिला प्रतिष्ठानची आदिवासी भगिनींबरोबर दिवाळी!

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील स्वायत्त श्रमिक महिला प्रतिष्ठानच्या वतीने मावळ तालुक्यातील फळणे या गावात कातकरी व ठाकर या आदिवासी समाजातील महिला व मुलांसमवेत अनोखी दिवाळी साजरी करण्यात आली.

यावेळी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा निर्मला जगताप, अंजली ब्रह्मे, कीर्ती नाईक, सुरेखा वाडेकर, जयश्री वीरकर, कांचन राजकर, अनिता धाकरस, उदय वाडेकर, अशोक वाडेकर आदींनी आदिवासी भगिनी व मुलांना लाडू, चिवडा, चकली, फराळाचे पदार्थ, जीवनावश्यक वस्तू तसेच फटाके व कपडे देऊन एक अनोखी दिवाळी साजरी केली.

फळणे (मावळ) टाकळी बु, येथील रहिवासी ठाकर समाजाच्या शांताआजी यांनी आपले आजवरच्या उभ्या आयुष्यातील पाच पिढ्या पाहिल्या असून त्यांना 35 मुले-मुली आहे. त्याच वाडीतील शांताआजींनी गावात लाईट, पाणी, आधारकार्ड, रेशनकार्ड, जन्म-मृत्यू नोंद अशा अनेक सुविधा ललित काकडे व शशिकांत आल्हाट यांच्यामार्फत गावामध्ये राबविल्या. ज्योत्स्ना गाजरे गावात येवून मुलांना योग्यरित्या शिक्षण देण्याचे अनोखे काम राबवितात. शाळेच्या मुलांनी वारली पेंटींग व गाणी गााऊन दिवाळीचा आनंद द्विगुणित केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.