BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : आठवडाभरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तीन हजार जणांवर कारवाई

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – वाहने चालवताना वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे मागील आठ दिवसात वाहतूक विभागाने 3 हजार 73 जणांवर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीवरून ट्रिपल सीट जाणे, वाहन चालविण्याचा परवाना वाहनांची कागदपत्रे सोबत न बाळगणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, फॅन्सी नंबर प्लेट, तसेच वाहनांना नंबर प्लेट न लावणे, रस्त्यावर हुल्लडबाजी आणि वाढदिवस साजरे करणे अशा गोष्टींना प्रतिबंध घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून ठोस उपाययोजना करण्यात येत आहेत. वरील गोष्टींना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी गुंडा स्काॅड पथक तयार केले आहे.

 • गुंडा स्काॅड पथकामध्ये स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी आणि गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश करण्यात आला आहे. हे पथक दररोज सायंकाळी सात ते रात्री बारा या कालावधीत शहरात विशेष गस्त करणार आहे. दरम्यान वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. गुरुवार (दि. 9) ते बुधवार (दि. 15) या आठवडाभराच्या कालावधीत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 3 हजार 73 जणांवर कारवाईचा बडगा उगारला.

आठवडाभराच्या कालावधीत पोलिसांनी एकूण सहा हजार 782 वाहनांची तपासणी केली. त्यातील 2531 वाहनांवर कायद्याचे उल्लंघन केल्याबाबत कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर 145 हॉटेलवर वेळेची मर्यादा व इतर नियमांच्या उल्लंघनाबाबत कारवाई करण्यात आली आहे.

 • मागील आठवडाभरात करण्यात आलेली कारवाई –
 • भारतीय दंड विधान कलम 279 – 81
  ट्रिपल सीट – 870
  विना परवाना, कागदपत्रे नसणे – 606
  हेल्मेट न घालणे – 262
  मोबाईलवर बोलणे – 303
  फॅन्सी नंबर प्लेट – 121
  नंबर प्लेट नसणे – 162
  मुंबई पोलीस कायदा कलम 110 112 117 अन्वये – 668
  एकूण कारवाई – 3073
HB_POST_END_FTR-A2

.