Chinchwad : कोरोना रुग्णांच्या जेवणाबाबत विशेष काळजी घ्या : मनसेची ‘ईएसआय’च्या डॉक्टरांकडे मागणी

Take special care of corona patients' meals: MNS demands ESI doctors :दोषींवर तात्काळ कारवाई करा

एमपीसीन्यूज : मोहननगर येथील ईएसआय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या कोरोना रुग्णांच्या जेवनात माश्या आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या शिष्टमंडळाने आज, बुधवारी या हॉस्पिटलमध्ये जाऊन तेथील डॉक्टर व अधिकाऱ्यांची भेट घेतली. रुग्णांच्या जेवणाच्या बाबतीत योग्य ती काळजी घेत तपासणी करुनच त्यांना जेवण देण्याची मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

दरम्यान, ईएसआय रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीषा पाटील, निवासी अधीक्षक डॉ. पाठक आणि प्रशासकीय अधिकारी डॉ. कासोदेकर यांच्यासोबत या प्रश्नी सकारात्मक चर्चा झाली. यावेळी त्यांनी रुग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणाबाबत योग्य ती काळजी घेण्याचे आश्वासन दिले, अशी महिती मनसेचे शहर सचिव राहुल जाधव यांनी दिली.

कोरोनाच्या साथीने सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत. महापालिका रुग्णांलयांसह अन्य सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. मोहननगर येथील ईएसआय हॉस्पिटलमधेही कोरोना रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत.

यापैकी एका रुग्णाचा जेवणाच्या ताटात चक्क माशा आणि अळ्या आढळून आल्या. सोमवारी ( दि. ६) हा प्रकार घडला.

त्यावर मनसेने आक्रमक पवित्र घेत रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या जेवणात माशा आढळून आल्याचा प्रकार गंभीर असून या यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मनसेने केली होती.

त्यानंतर आज, बुधवारी मनसेच्या शिष्टमंडळाने हॉस्पिटलमध्ये जाऊन तेथील डॉक्टर व अधिकारी यांची भेट घेतली. रुग्णांच्या जेवणाच्या बाबतीत योग्य ती काळजी घेत तपासणी करुनच त्यांना जेवण देण्याची मागणी केली.

यावेळी मनसेचे शहर सचिव राहुल जाधव यांच्यासह शहर उपाध्यक्ष विशाल मानकरी आणि विभाग अध्यक्ष दत्ता देवतरासे उपस्थित होते.

महापालिका भांडार विभागाचे सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे म्हणाले, जेवणात माश्या आणि अळ्या सापडल्या असतील तर ते गंभीर आहे. त्याची तपासणी करण्यात येईल. संबंधित पुरवठादारावार निश्चित कारवाई केली जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.