Chinchwad : धर्मनिरपेक्ष समाजविधायक कामात पुढाकार घ्यावा -डॉ. दीपक शहा

एमपीसी न्यूज – युवकांनी शैक्षणिक गुणवत्तेवर लक्ष केंद्रीत करीत धर्मनिरपेक्ष समाजविधायक कामात पुढाकार घ्यावा, असे अवाहन कमला शिक्षण संकूलाचे सचिव डॉ. दीपक शहा यांनी केले.

चिंचवड येथील कमला शिक्षण संकूल संचलीत प्रतिभा महाविद्यालयातील वाणिज्य, विज्ञान व प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटमधील एम.बी.ए. संगणक क्षेत्रात शिक्षण घेणार्‍या युवक-युवतीनी एकत्रित येऊन गणेशोत्सव, ओणम सण केरळचे प्रसिध्द वाद्य चंडा मलेम वाद्याच्या गजरात महाविद्यालयीन युवक-युवती महाराष्ट्रीयन व केरळचे पारंपारीक वेशभूषा परीधान करुन मिरवणूकीद्वारे दोन्ही सणाचे औचित्य साधत राष्ट्रीय एकात्मकता निर्माण केली.

यावेळी व्यासपीठावरती सचिव डॉ. दीपक शहा, प्राचार्य डॉ.बाबासाहेब सांगळे, नवनिर्वाचित उपप्राचार्या डॉ.क्षितीजा गांधी एम.बी.ए. विभागाचे संचालक डॉ.सचिन बोरगावे समवेत प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

डॉ.दीपक शहा पुढे म्हणाले, पिंपरी चिंचवड औद्यागिक नगरीत देशभरातील विविध जातीधर्माचे लोक नोकरी व्यवसायामुळे स्थायिक झाले आहे. महाविद्यालयातील प्राध्यापिका निजी साजनयांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी शरद जगताप मृदूला चौगुले, अमल कृष्णण, लिबीशा सजी, बीनॉय वर्गीस समवेत इतर 70 विद्यार्थ्यानी एकत्रित येवून हिंदू धर्मीयांचे अराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्त्या गणरायाचे गणेश उत्सव दहा दिवस साजरा करण्यात येत आहे.

त्यातच केरळ राज्यात नवीन वर्ष ओणम या उत्सावात होत आहे. दोन्ही सणांचे महत्व विद्यार्थ्यांनी नाटीकेद्वारे सादर करुन जणू राष्ट्रीय एकात्मकता निर्माण केली. गणेश उत्सावत देशभरात समाजलक्षी मंडळे पौराणिक देखावे, समाजविधायक कामे उत्सव काळात करतात.

प्रा.निजी साजन म्हणाल्या, केरळ राज्यात नवीन वर्ष ओणम या उत्सावने सुरु होते. या महिन्यात दैत्यराज महाबदली या प्रलहादाच्या नातवाच्या न्यायीपणाची, पराक्रमाची आणि त्याच्या बद्दल असलेल्या प्रेमाची आठवण म्हणून साजरा केला जात आहे. याचा आम्हाला विशेष आनंद होत आहे.

अमल कृष्णन यांनी बहाबली राजाची वेशभुषा केली होती. प्रा.साजन निजी यानी केरळची वेशभुषा करुन नृत्य सादर केली. केरळमधील पारंपारीक नौका स्पर्धाचे नृत्याद्वारे सादरीकरण केले. इतर विद्यार्थ्यांनी पारंपारीक वेशभूषेत केरळचे नृत्य व गीत सादर केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.