_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Chinchwad : सात वर्षांपासून फरार असलेला आरोपी पोलिसांच्या जाळ्यात; गुन्हे शाखा युनिट पाचची कामगिरी

The accused, who has been absconding for seven years, is in police custody; Performance of Crime Branch Unit Five

एमपीसी न्यूज – दोरोडा टाकण्याच्या गुन्ह्यातील सात वर्षांपासून पोलीसांना गुंगारा देत फरार झालेला आरोपीला पोलिसांनी चिखली परिसरातून अटक केली. गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी ही कामगिरी केली.

दादा उर्फ दाद्या आण्णा धनवट (वय. 30, रा.चिखली), असे अटक आरोपीचे नाव आहे. दाद्या हा दरोडा टाकण्याच्या प्रयत्नातील गुन्ह्यातील आरोपी असून तो सात वर्षांपासून पोलीसांना गुंगारा देत होता.

पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी पाहिजे व फरार असलेल्या आरोपींना अटक करण्याबाबत गुन्हे शाखेला आदेश दिले आहेत. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकावर ही कामगिरी सोपविली आहे.

_MPC_DIR_MPU_II

दरम्यान, गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकातील पोलिस नाईक सावन राठोड यांना आरोपी ‘दाद्या’ भीमशक्ती नगर, चिखली येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी चिखली म्हेत्रे गार्डन चौक येथे सापळा लावला. त्यावेळी आरोपी पायी चालत येत होता. मात्र, त्याला पोलिसांचा संशय आल्याने तो पळून जाऊ लागताच पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.

त्याच्यावरील गुन्ह्याची पाहणी करून पुढील तपासासाठी त्याला देहूरोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहा पोलीस आयुक्त आर. आर. पाटील यांच्या मार्गद्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस कर्मचारी धनराज किरनाळे, दत्तात्रय बनसुडे, सावन राठोड, संदिप ठाकरे, ज्ञानेश्वर गाडेकर, स्वामीनाथ जाधव, फारुक मुल्ला, नितिन बहिरट, श्यामसुदंर गुट्टे, गणेश मालुसरे, मयूर वाडेकर, भरत माने, राजकुमार इघारे, दयानंद खेडकर, धनंजय भोसले, गोपाळ ब्रम्हांदे यांनी ही कामगिरी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.