Chinchwad : वाटसरूच्या प्रसंगावधानामुळे काळा सराटी पक्ष्याला मिळाले जीवनदान

एमपीसी न्यूज – रस्त्याने जाणा-या संवेदनशील वाटसरूने प्रसंगावधान दाखवल्यामुळे काळा सराटी या पक्ष्याला जीवनदान मिळाले. डोळ्याला आणि पायाला गंभीर जखम झाल्याने तसेच शरीरातील पाणी कमी झाल्याने पक्षी रस्त्याच्या बाजूला पडला. त्याला वेळीच रुग्णालयात नेऊन उपचार केले. यामुळे पक्ष्याला जीवनदान मिळाले आहे.

संतोष साठे हे निगडीहून पिंपरीला कामासाठी जात होते. चिंचवडमधील जुना पुणे-मुंबई महामार्गावर टायटन शोरूमच्या समोर आले असता त्यांना रस्त्याच्या बाजूला एक पक्षी जखमी अवस्थेत पडलेला आढळला. त्यांनी त्याला उचलून बघितले. त्याला पाणी पाजून त्यांनी तात्काळ पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बहिणाबाई चौधरी सर्प उद्यानात नेले. उद्यानातील डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले.

  • उद्यानातील बायोलॉजिस्ट कम एज्युकेशनल ऑफिसर प्राची मयेकर यांनी जखमी काळा सराटी पक्ष्यावर उपचार केले. पक्ष्याच्या डोळ्याला आणि पायाला इन्फेक्शन झालं होतं.

तसेच त्याच्या शरीरातील पाणी कमी झालं होतं. त्याच्यावर योग्य उपचार केले आहेत. उपचार पूर्ण झाल्यानंतर त्याला पुन्हा आकाशात भरारी घेण्यासाठी सोडण्यात येईल, असे प्राची मयेकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like