BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : वाल्हेकरवाडी येथे आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – वाकड येथे अज्ञात मुलाचा मृतदेह आढळल्याची घटना घडल्यानंतर लगेच दोन दिवसात चिंचवड मधील वाल्हेकरवाडी येथे एका इसमाचा मृतदेह आढळला आहे. ही घटना आज (रविवारी) दुपारी तीनच्या सुमारास वाल्हेकरवाडी मधील स्पाईन रोडजवळ उघडकीस आली. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (रविवारी) दुपारी तीनच्या सुमारास वाल्हेकरवाडी येथील स्थानिक नागरिकांनी नियंत्रण कक्षाला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती दिली. नियंत्रण कक्षातून चिंचवड पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वाल्हेकरवाडी येथील स्पाईन रोडजवळ असलेल्या मोठ्या सिमेंटच्या पाईप जवळ एका 35 ते 40 वय असलेल्या पुरुषाचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाजवळ दारूची बाटली असल्याने तो बेवडा असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच त्या व्यक्तीची ओळख देखील अद्याप पटली नाही. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

वाकड येथे संतोष मंगल कार्यालयाजवळ मोकळ्या जागेत एका 3 ते 4 वर्ष वयाच्या मुलाचा निर्घृणपणे खून करून त्याचा मृतदेह पुरण्यात आला होता. जनावरांनी तो मृतदेह बाहेर काढल्यानंतर तो प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर लगेच दोन दिवसात आणखी एक मृतदेह आढळल्यामुळे शहरात गंभीर वातावरण तयार झाले आहे.

HB_POST_END_FTR-A4

.