Chinchwad : काळेवाडी-पिंपरीला जोडणारा पूल पुढील आदेशापर्यंत वाहतुकीस बंद; शहरातील अनेक रस्ते बंद

एमपीसी न्यूज – काळेवाडी आणि पिंपरीला जोडणारा काळेवाडी पूल वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आला आहे. त्याचबरोबर पिंपरी-चिंचवड शहरातील अन्य काही रस्ते देखील बंद करण्यात आले आहेत. हा बदल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आला असून, पुढील आदेश येईपर्यंत शहरातील अनेक रस्ते बंद असणार आहेत.

पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. बंद करण्यात आलेले मार्ग खालील प्रमाणे –

# काळेवाडी -पिंपरी या दोन गावांना जोडणारा काळेवाडी पूल सार्वजनिक वाहतुकीसाठी बंद

# चांदणी चौक पीएमटी चौकाजवळ भोसरी –

पूजा टूर्स अँड ट्रॅव्हल्स – भोसरी मेन रोड – मॅक्झिनियस केक शाॅप – मेघना सोनोग्राफी सेंटर – लांडेवाडी रोड – पिंपरी चिंचवड महापालिका भोसरी करसंकलन कार्यालय – भगवान गव्हाणे चौक – लोंढे गिरणी – विनय सुपर मार्केट – आई तुळजाभवानी मंदिर – मारुती मंदिर – पूजा टूर्स अँड ट्रॅव्हल्स

# क्रांतिवीर नगर थेरगाव गावठाण मधील भाग –

रहाटणी लींक रोड वरील स्वस्तिक डायमंड अपार्टमेंट – रहाटणी लींक रोड – आस्था मेडिकल स्टोअर्स तेथून आत हॉटेल सिल्वर 9 कडे जाणारा रोड – होटेल सिल्वर 9 – ए विंग एस ओरा सोसायटी – रहाटणी लींक रोड वरील स्वस्तिक डायमंड अपार्टमेंट तसेच डांगे चौक – आदित्य बिर्ला रुग्णालय चौक – तापकीर चौक – काळेवाडी फाटा चौक – डांगे चौक

# दिघी गावठाण स्कायलाइन सोसायटीच्या चतुःसिमा –

हॉटेल द्वारकाधीश – ओम सुपर मार्केट – फेज 3 रोड – ओम साई नर्सरी – श्री साई हॉस्पिटल – हॉटेल द्वारकाधीश

वरील मार्ग वाहतुकीसाठी बंद असून या मार्गावर केवळ अग्निशमन विभाग, पोलीस, रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवेतील वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.