Chinchwad : बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – बसची धडक बसल्याने जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (दि. 8) रात्री बाराच्या सुमारास वाल्हेकरवाडी चिंचवड येथे येथे झाला.

आनंदा दादू मांगले (वय 30, रा. बिजलीनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार भगवान बन्सीलाल पाटील (वय 43, रा. बिजलीनगर, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • शंकर बाळासाहेब बोंगार्डे असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर बुधवारी रात्री बाराच्या सुमारास वाकडहुन वाल्हेकरवाडी येथे दुचाकीवरून (एमएच 14 / सीई 2594) येत होता. तो वाल्हेकरवाडीमधील गुरुकृपा प्रिंटर येथे आला असता भरधाव वेगात आलेल्या बसने (एमएच 14 /जीडी 6765) शंकरच्या दुचाकीला धडक दिली.

  • यामध्ये शंकर गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. याबाबा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस याचा तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.