Chinchwad : भरधाव वेगात आलेल्या पिकअपच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

एमपीसी न्यूज – मोपेड दुचाकीवरून वाल्हेकरवाडीहून चिंचवडच्या दिशेने जाणा-या दोघांना भरधाव वेगात आलेल्या पिकअपने जोरदार धडक दिली. यामध्ये तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 30) रात्री साडेदहाच्या सुमारास स्पाईन रोड चौक वाल्हेकरवाडी येथे घडली.

किरण नाथा चव्हाण असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. या घटनेत महेश चंदनशिवे जखमी झाले आहेत. याप्रकरणी मनोज प्रकाश धुमाळ (वय 28, रा. चिंचवडे नगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी पिकअप चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री मयत तरुणी किरण आणि महेश हे दोघे मोपेड दुचाकी (एमएच 14/ डीजी 4310) वरून वाल्हेकरवाडीहून चिंचवडच्या दिशेने जात होते. ते स्पाईन रोड चौकात आले असता समोरुन भरधाव वेगात आलेल्या पिकअपने त्यांच्या दुचाकीस धडक दिली. यामध्ये किरण आणि महेश दोघांनाही गंभीर दुखापत झाली. त्यात किरणचा मृत्यू झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.