Chinchwad : मोरयांचा जीवनपट शिल्पाद्वारे पाहण्याची संधी भाविकांना मिळणार

एमपीसी न्यूज – श्रीमन महासाधु मोरया गोसावी यांच्या जीवनाची माहिती भाविकांना व्हावी, या उद्देशाने चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या सहकार्याने विविध ३० शिल्प चित्रांमधून त्यांचा जीवनपट उलगडणार आहे.

चिंचवड येथील मोरया गोसावी समाधी मंदिर परिसरातील प्रदक्षिणा मार्गावर सध्या तीन शिल्प बसविण्यात आली आहेत. अष्टविनायक दर्शविणारी चित्र, पार्वतीदेवी यांच्या मांडीवर मोरया गोसावी यांना गणेशांनी दिलेला आशीर्वाद आणि वामन भट यांना मोरयाने मयुरदर्शन दिले होते. अशा आशयाची तीन शिल्प बसविण्यात आली असून भाविकांचे आकर्षण बनले आहे.

  • या शिल्पांचे वैशिष्ट्य म्हणजे ऊन, वारा आणि पावसापासून बचाव करण्यासाठी आवरण बसविण्यात आले आहे. पावसाळ्यात पाणी शिरते. या पाण्यामुळे शिल्पाला कोणताही धोका पोहचणार नाही, याची काळजी चिंचवड देवस्थान ट्रस्टने घेतली आहे.

मोरया गोसावी यांचा जीवनपट सर्व स्तरांपर्यंत पोहचावा, यासाठी ट्रस्ट गेल्या अनेक वर्षांपासून विविध माध्यमांतून प्रयत्न करीत आहे. एकूण ३० शिल्प उभारण्यात येणार आहे. त्यातील पहिल्या टप्प्यांत तीनच शिल्प तयार झाली आहे. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मोरयाचा महिमा हा चित्रपट दाखविण्याची सोय घाटावर यापूर्वी केली होती.

  • याठिकाणी उभारण्यात आलेल्या शिल्पाचे प्रथम एक चित्र काढावे लागते. त्यानंतर त्याचे क्ले मॉडेल तयार करुन फायबरचे चित्र तयार होते. पुढील दोन वर्षात ३३ म्यु्ॅरल बसविण्यात येणार आहे. ६ बाय ४ फूटाचे दोन म्युरल्स आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.