Chinchwad : सोसायटीच्या पार्किंगमधून पळविल्या महागड्या सात सायकल

एमपीसी न्यूज – सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या महागड्या सात सायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. हा प्रकार गुरुवारी (दि. 22) सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आला.

सुभाष गणपतराव शिराळे (वय 51, रा. वाल्हेकरवाडी) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्हेकरवाडीमधील ऋतुगंध सोसायटीच्या पार्किंगमध्ये नागरिकांनी त्यांच्या सायकल लावल्या होत्या. गुरुवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी सोसायटीच्या पार्किंगमधून 83 हजार 734 रुपये किमतीच्या सात सायकल चोरून नेल्या.

हा प्रकार गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.