Chinchwad : कारवाईचा जोर वाढला; एकाच दिवशी तब्बल 237 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या काळात प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधातील कारवाईने पुन्हा जोर धारला आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी सोमवारी (दि. 7) एकाच दिवशी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल 237 जणांवर कारवाई केली आहे. यामध्ये चिखली पोलीस अव्वल असून चिखली पोलिसांनी एकाच दिवशी 77 जणांवर कारवाई केली आहे.

मागील दोन आठवड्यांमध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांनी कारवाईचा जोर कमी केला होता. दिवसेंदिवस शहरात कोरोना बधितांची संख्या हजारोंच्या संख्येनेवाढतच आहे.

सोमवारी 1 हजार 259 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर शहरातील आजवरचा कोरोना बधितांचा आकडा 56 हजार 493 वर पोहोचला आहे.

कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढल्याने अधिक काळजी घेण्याची गरज आहे. यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदी, जमावबंदीच्या आदेशाची पोलीस अंमलबजावणी करीत आहेत.

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड विधान कलम 188 नुसार कारवाई केली जात आहे.

सोमवारी केलेली कारवाई – एमआयडीसी भोसरी (17), भोसरी (3), पिंपरी (18), चिंचवड (5), निगडी (19), आळंदी (19), चाकण (0), दिघी (0), म्हाळुंगे चौकी (0), सांगवी (7), वाकड (9), हिंजवडी (28), देहूरोड (0), तळेगाव दाभाडे (6), तळेगाव एमआयडीसी (13), चिखली (77), रावेत चौकी (7), शिरगाव चौकी (9)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.