BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : तीन लाखांची खंडणी मागत तरुणाचे अपहरण आणि सुटका

एमपीसी न्यूज – तीन लाखांच्या खंडणीसाठी चार जणांनी मिळून तरुणाचे अपहरण केले. तरुणाकडून पैसे न मिळाल्याने आरोपींनी त्याला मारहाण करून सोडून दिले. ही घटना गुरुवारी (दि. 18) दुपारी साडेतीनच्या सुमारास चिंचवड येथे घडली.
ओंकार ज्ञानदेव वटाणे (वय 24, रा. चिंचवड) असे अपहरण आणि सुटका झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार यशवंत ताडीवाल, चंदू कांबळी आणि अन्य दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ओंकार याचे चिंचवडमधील केसर हॉटेल समोरून अपहरण केले. त्याला जबरदस्तीने त्यांच्या मोटारीत बसवून नेले. ओंकारकडे आरोपींनी तीन लाख रुपयांची मागणी केली. तसेच पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. ओंकार यांनी पैसे देण्यास नकार दील्यामुळे आरोपींनी त्यांना हाताने मारहाण केली काही वेळेनंतर आरोपींनी ओंकार यांना चिंचवड येथे सोडून दिले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.
HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3