Chinchwad : पवनेत जलपर्णीचे साम्राज्य, मैलापाणी सुद्धा जातेय थेट नदीत

The kingdom of water hyacinth in the wind, the sewage also goes directly into the river

एमपीसी न्यूज – तानाजीनगर येथील ड्रेनेज लाईन फुटल्यामुळे मैलामिश्रित पाणी थेट पवना नदीत जात आहे. अगोदरच नदीत असलेल्या जलपर्णी या मैलामिश्रित पाण्यामुळे अधिकच वाढत आहे. तोंडावर असलेला पावसाळा आणि त्यामुळे पसरणारी रोगराई विचारात घेता या परिसरातील नागरिक चिंता व्यक्त करत आहेत.

तानाजीनगर येथील फुटलेल्या ड्रेनेज लाईनचे हजारो लिटर मैलामिश्रित पाणी नदी पात्रात जात आहे. मैलामिश्रित पाणी जलपर्णी वाढीसाठी पोषक असल्यामुळे नदीत अगोदरच असलेली जलपर्णी अधिकच वाढत आहे.

कोरोना महामारी आणि येणारा पावसाळा पाहता रोगराई पसरण्याची भीती परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.

काकडे पार्क ते लक्ष्मीनगर परिसरात जलपर्णी अधिकच वाढली असून महानगरपालिकेने जलपर्णी काढण्यासाठी ठेकेदार नेमला आहे.

मात्र, पालिका अधिकारी व संबंधित ठेकेदार याबाबत दुर्लक्ष करत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांकडून करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.