Chinchwad : पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचा सोमवारी पुरस्कार वितरण सोहळा

एमपीसी न्यूज – पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी आणि श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालय, चिंचवड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘दिवाळी अंक पारितोषिक’ वितरण सोहळा उद्या (सोमवारी, दि. 24) दुपारी दोन वाजता श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालय, चिंचवड येथे होणार आहे. या सोहळ्यात कवी विठ्ठल वाघ आणि पोपटराव पवार यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

डॉ. डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी डी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या सोहळ्यास ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस, टाटा मोटर्सचे मनोहर पारळकर, सुदाम भोरे, अण्णा जाधव उपस्थित राहणार आहेत. लोककवी डॉ. विठ्ठल वाघ यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आणि हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

कार्यक्रमात कवी भरत दौंडकर, माधव पवार, प्रशांत केंदळे, इंद्रजित घुले, ललिता सबनीस, संगीता झिंजुरके यांचे काव्य वाचन होणार आहे. राज्यभरातून आलेल्या 109 दिवाळी अंकातून नारायण सुर्वे पारितोषिकांची 30 दिवाळी अंकांची निवड करण्यात आली आहे.

पुरस्कार जाहीर झालेले दिवाळी अंक –
मुख्य विभाग
प्रथम – ऋतुरंग (मुंबई)
द्वितीय – साप्ताहिक सकाळ (पुणे), शब्दमल्हार (नाशिक)
तृतीय – पुण्यनगरी (सांगली), साहित्यस्वानंद (पुणे), अधोरेखित (वसई)
चतुर्थ – कुबेर (संगमनेर), आश्लेषा (ठाणे), शब्दाई (पुणे)
पाचवा – चौफेर समाचार (सांगली)

सांस्कृतिक विभाग
प्रथम – पुण्यभूषण (पुणे)
द्वितीय – वारसा (मसाप-सावेडी, अहमदनगर)

ग्रामीण विभाग
प्रथम – शब्दशिवार (मंगळवेढा)
द्वितीय – प्रतिभा (इस्लामपूर)
तृतीय – साहित्यसागर (कवठेमहांकाळ)
उत्तेजनार्थ – नाथनगरी (आटपाडी), मैत्र जीवांचे (आळंदी)

कथा संग्रह विभाग
प्रथम – माय मराठी (पुणे)
द्वितीय – पिंगळावेळ (पुणे)
तृतीय – उत्तम अनुवाद (पुणे)

प्रवास / भटकंती विभाग
प्रथम – दुर्गाच्या देशातून (पुणे)
द्वितीय – समदा (पुणे)
तृतीय – व्हाईट स्पेस (पुणे)

आरोग्य विभाग
प्रथम – जनस्वास्थ्य (सांगली)
द्वितीय – साहित्यविश्व (अलिबाग)
तृतीय – ता-यांचे जग (मुंबई)

औद्योगिक विभाग
प्रथम – कलासागर (पुणे)
द्वितीय – कमिन्स प्रतिभा (पुणे)

बालसाहित्य विभाग
प्रथम – रंगतदार (ठाणे)

विशेष विभाग
हस्तलिखित – अक्षरगंगा (पुणे)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.