Chinchwad : पोलिसांच्या ‘टू मोबाईल’ या वाहनाची तोडफोड?; शहरात वाहनांच्या तोडफोडीचे सत्र सुरुच

एमपीसी न्यूज – पोलिसांच्या ‘टू मोबाईल’ या वाहनाची तोडफोड केल्याचा प्रकार आज, रविवारी (दि. 16) सकाळी उघडकीस आला आहे. तोडफोड केलेले वाहन वाल्हेकरवाडी, चिंचवड पोलीस चौकीसमोर उभे आहे. शहरात सध्या वाहनांच्या तोडफोडीचे सत्र सुरुच आहे. त्यातून पोलीस वाहनेही सुटत नाहीत, अशी शहरात चर्चा सुरु झाली आहे.

पिंपरी चिंचवड शहरात प्रत्येक महिन्याला किमान दोन वाहनांच्या तोडफोडीच्या घटना घडत आहेत. दोन दिवसांपूर्वी रहाटणी येथेही टोळक्‍याने वाहनांची तोडफोड केली होती. तसेच जानेवारीपासून पिंपरी, काळेवाडी, थरमॅक्‍स चौक, सांगवी आदी ठिकाणी वाहनांच्या तोडफोडीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच चिंचवड पोलिसांच्या ‘टू मोबाईल’ या वाहनाची तोडफोड केल्याचे दिसून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सध्या हे वाहन वाल्हेकरवाडी पोलीस चौकीसमोर उभे आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे यांना याबाबत विचारले असता त्यांनी पोलिसांच्या कोणत्याही वाहनाची तोडफोड झाली नसल्याचे सुरवातीला सांगितले. मात्र नंतर चालकाच्या चुकीमुळे काच फुटल्याचे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.