Chinchwad : रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या इसमाचा मोबाईल पळवला

एमपीसी न्यूज – कंपनीच्या गाडीची वाट पाहत रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या एका इसमाचा मोबाईल फोन अनोळखी चोरट्याने हिसकावून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 19) सकाळी पावणे सातच्या सुमारास लिंकरोड चिंचवड येथे घडली.

दिलीप कुमार मिश्रा (वय 41, रा. लक्ष्मीनगर, लींकरोड, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिलीप कुमार गुरुवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास लिंकरोड येथील गजानन ड्रायक्लीनर समोर कंपनीच्या गाडीची वाट पाहत उभे होते. त्यावेळी ते त्यांच्या मोबाईलवर ई-मेल तपासात (चेक) करत रस्त्याच्या बाजूला थांबले होते.

दुचाकीवरून आलेल्या अनोळखी चोरट्याने त्यांच्या हातातील सुमारे 40 हजार रुपयांचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून चोरून नेला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.