Chinchwad : ‘लॉकडाऊन’मध्येही चोरट्यांचा मुक्त संचार; एकाच रात्री चार मेडिकल दुकाने चोरट्यांनी फोडली

एमपीसी न्यूज – चार मेडिकल दुकानांची शटर उचकटून चोरी केल्याच्या घटना आज, बुधवारी (दि. 1) पहाटे चिंचवड येथे घडल्या. संपूर्ण देशात संचारबंदी असताना पिंपरी चिंचवड शहरात चोरटे मात्र मुक्त संचार करीत असल्याचे यावरून दिसून येत आहे.

 

सन्मती मेडिकल, महावीर मेडिकल, रिव्हायवल मेडिकल आणि आणखी एक दुकान (नाव समजू शकले नाही) अशी फोडलेल्या मेडिकल दुकानांची नावे आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी चिंचवड गावातील चार औषधाची दुकाने फोडली. शेवटचे रिव्हायवल हे या दुकानाचे शटर उचकटत असताना समोरील इमारतीमध्ये राहणाऱ्या एका नागरिकाने चोरट्यांना हटकले. यामुळे चोरटे दुचाकीवरून पळून गेले.

 

सध्या फक्त किराणा माल आणि औषधाची दुकाने सुरू आहेत. म्हणूनच चोरट्यांनी मेडिकलच्या दुकानांना लक्ष्य केल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. याबाबत अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.