Chinchwad : लायन्स क्लब ऑफ पुणे फिनिक्सच्या अध्यक्षपदी उज्ज्वला कुलकर्णी

एमपीसी न्यूज – लायन्स क्लब ऑफ पुणे फिनिक्स (डिस्ट्रिक्ट 3234 डी-2)च्या आठव्या अध्यक्षपदी सन 2019-20 या कालावधीसाठी उज्ज्वला कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली. याशिवाय सचिवपदी संगीता शाळिग्राम आणि खजिनदारपदी दीपश्री प्रभू यांची नियुक्ती करण्यात आली.

चिंचवड येथे झालेल्या समारंभात लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनलचे माजी जिल्हा प्रांतपाल गिरीश मालपाणी यांच्या हस्ते नूतन कार्यकारिणीने पदभार स्वीकारला. पदग्रहण समितीचे अध्यक्ष प्रदीप वडगावकर, फिनिक्स क्लबचे मावळते अध्यक्ष शशांक फाळके, माजी सचिव आदित्य फडतरे, विभागीय अध्यक्ष प्रदीप कुलकर्णी, उपविभागीय अध्यक्ष राजेंद्र कोळी, मकरंद शाळिग्राम, नरेंद्र पेंडसे, विदुला पेंडसे, मुकेश मित्तल, विनय देशपांडे आणि वल्लरी फडतरे यांची उपस्थिती होती.

  • नूतन कार्यकारिणीमध्ये प्रमोद चक्रदेव, प्रदीप कुलकर्णी, प्रवीण लडकत, नरेंद्र प्रभू, प्रसाद दिवाण, डॉ. संजय लकडे, संजय सत्तुर, अशोक पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी लायन्स क्लब ऑफ पुणे फिनिक्समध्ये सामील झालेल्या सात नवीन सदस्यांचे स्वागत करण्यात आले. नूतन अध्यक्षा उज्ज्वला कुलकर्णी यांनी यावेळी नवीन वर्षाच्या नियोजनाबद्दल सांगितले की, क्लबतर्फे वर्षभरात जलसंधारण, जल संकलन, पाणी वाचवणे, वृक्षारोपण तसेच विशेष मुलांसाठी चालणाऱ्या शाळेच्या मदतीसाठी अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

22 ऑगस्टला ‘घरात ‌मॅरीड, बाहेर बॅचलर’ विनोदी नाटक
या उपक्रमासाठी सदस्य स्वतः निधी उपलब्ध करीत आहेत. त्याचप्रमाणे ‘घरात ‌मॅरीड, बाहेर बॅचलर’ या तुफान विनोदी नाटकाचा प्रयोग आयोजित करून निधी उभारण्यात येत आहे. या नाटकाचा प्रयोग 22 ऑगस्ट रोजी चिंचवडच्या रामकृष्ण मोरे सभागृहात होणार आहे. यावेळी महाराष्ट्र वनवासी कल्याण आश्रम यांना आर्थिक आणि दोन गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत जाहीर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र पेंडसे आणि वल्लरी फडतरे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.