Chinchwad : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगामी सण, उत्सव सार्वजनिकपणे साजरे करू नये

 महापालिका, पोलीस प्रशासनाच्या नागरिकांना सूचना; पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात सर्वधर्मीय नागरिकांची बैठक

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात शहरातील सर्वधर्मीय व्यक्ती, प्रतिष्ठित व्यक्ती आणि विविध राजकीय पक्षाचे व संस्थांचे प्रतिनिधी यांची. सोमवारी (दि. 6)  बैठक  पार  पडली. या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगामी सण, उत्सव सार्वजनिकपणे साजरे करू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

यावेळी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ आदी उपस्थित होते.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्स राखण्याचे महत्व व त्याची आवश्यकता, होम क्वारंटाईन केलेल्या लोकांसाठी सूचना, जे लोक बाधित लोकांच्या संपर्कात आलेले आहेत त्यांनी काय करावे, याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी माहिती दिली. सर्व नागरिकांनी आतापर्यंत चांगले सहकार्य केले असून असेच सहकार्य यापुढील काळात देखील करावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.

प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचना समाजातील सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचे उपस्थितांना आवाहन करण्यात आले. सर्व उपस्थितांनी प्रशासनाच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. उपस्थितांनी देखील सर्व सूचना समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले.

 “शासनाकडून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा भंग केल्यास पोलीस कारवाई करत आहेत. त्यामुळे भविष्यात संबंधित व्यक्तीला नोकरी व इतर ठिकाणी त्याचा त्रास होऊ शकतो. आगामी काळात साजरे होणारे सण डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, हनुमान जयंती, शब्बे ए बारात हे सार्वजनिकरीत्या साजरे न करण्याबाबत सूचना दिल्या.  संदीप बिष्णोई -पोलीस आयुक्त . 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.