BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : बंद फ्लॅटमध्ये चोरी; किमती वस्तू लंपास

एमपीसी न्यूज – कुलूप लावून बंद असलेल्या फ्लॅटमध्ये चोरट्यांनी चोरी केली. फ्लॅटमधून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि अन्य किमती वस्तू चोरून नेल्या. ही घटना गुरुवारी (दि. 29) रोजी चिंचवड येथे उघडकीस आली.

ऋषिकेश भरतकुमार गोरे (वय 29, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ऋषिकेश यांचा फ्लॅट 2 जुलै ते 29 ऑगस्ट या कालावधीत कुलूप लावून बंद होता. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी फ्लॅटचा कडी-कोयंडा कापून आत प्रवेश केला. चोरट्यांनी फ्लॅटमधून सोन्याची साखळी, चांदीच्या मूर्तीची डायल आणि घड्याळ असा एकूण 52 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3