Chinchwad : घरफोडी करून 90 हजारांचे दागिने लंपास

ही घटना जून 2020 ते 3 ऑगस्ट 2020 या कालावधीत वृंदावन सोसायटी, श्रीधरनगर, चिंचवगाव येथे घडली. theft Jewelry worth Rs 90,000 by burglary

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनच्या कालावधीत घरातील सर्वजण गावी गेल्याने बंद असलेल्या फ्लॅट फोडून चोरट्यांनी 90 हजारांचे दागिने चोरून नेले.

ही घटना जून 2020 ते 3 ऑगस्ट 2020 या कालावधीत वृंदावन सोसायटी, श्रीधरनगर, चिंचवगाव येथे घडली.

अक्षय प्रवीण बंब (वय 30, रा. श्रीधरनगर, चिंचवडगाव) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे चुलत मावस भाऊ दीपक फुलपगर हे मार्च 2020 मध्ये लॉकडाऊन जाहीर झाल्याने आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव या मूळ गावी गेले.

त्यानंतर त्यांचा चिंचवडगाव येथील फ्लॅट लॉक लाऊन बंद होता. मध्यंतरीच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचे लॅचलॉक तोडून आत प्रवेश केला.

फ्लॅटमधील मास्टर बेडचे लॅच तोडून 55 हजारांचा सोन्याचा नेकलेस, 20 हजारांची कर्णफुले, 15 हजारांची अंगठी असे एकूण 90 हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले.

चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.