Chinchwad : चिखली, हिंजवडीमधून कार, बुलेट आणि मोपेडची चोरी

वाहन चोरीच्या वाढत्या घटनांमुळे शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण आहे. : Theft of cars, bullets and mopeds from Chikhali, Hinjewadi

एमपीसी न्यूज – चिखली परिसरातून एक कार तर हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बुलेट आणि मोपेड दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत गुरुवारी (दि. 13) गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. वाहन चोरीच्या वाढत्या घटनांमुळे शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

अशोक कंन्टीआप्पा कु-हाडे (वय 41, रा. सोमाटणे फाटा, तळेगाव दाभाडे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांनी त्यांची दोन लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी कंपनीची सियाज कार (एमएच 14 / ईवाय 8933) 28 जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजता चिखली प्राधिकरण येथील सेक्टर नंबर 13 मध्ये मोकळ्या जागेत पार्क केली होती. 4 ऑगस्ट रोजी त्यांची कार चोरीला गेल्याचे उघडकीस आले.

चिखली पोलीस तपास करीत आहेत.

सागर सोपान जगताप (वय 34, रा. मारुंजी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादी जगताप यांनी त्यांची 40 हजार रुपये किमतीची बुलेट (एमएच 12 / जीके 6782) 11 ऑगस्ट रोजी रात्री राहत्या घरासमोर पार्क केली. रात्री अज्ञात चोरट्यांनी लॉक तोडून बुलेट चोरून नेली. हा प्रकार 12 ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आला.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी एक वाहन चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत सागर गौतम भालेराव (वय 28, रा. कोरेगाव पार्क, मुंढवा, पुणे) यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भालेराव यांनी त्यांची 30 हजार रुपये किमतीची मोपेड दुचाकी (एम एच 12 / एन एस 0651) 10 ऑगस्ट रोजी दुपारी साडेपाच वाजता चांदणी चौकातील बंद पेट्रोल पंपावर लॉक करून पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार रात्री नऊ वाजता उघडकीस आला.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.