Chinchwad : बिर्ला नर्सिंग कर्मचाऱ्यांचा कोणताही संप नाही; अफवांवर विश्वास ठेवू नका – रेखा दुबे

There is no strike of Birla nursing staff; Don't believe the rumors - Rekha Dubey : बिर्ला नर्सिंग कर्मचाऱ्यांचा कोणताही संप नाही; अफवांवर विश्वास ठेवू नका - रेखा दुबे

एमपीसी न्यूज – आदित्य बिर्ला हॉस्पिटलमधील नर्सिंग कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा संप पुकारला नसून ते रुग्णांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी पूर्णवेळ काम करत आहेत. त्यामुळे नागरिक व प्रसारमाध्यमांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा दुबे यांनी केले आहे.

रेखा दुबे यांनी प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की, आदित्य बिर्ला हॉस्पिटलमधील नर्सिंग कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा संप पुकारला नसून ते रुग्णांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी पूर्णवेळ काम करत आहेत.

सध्या हॉस्पिटलमधील खाटा पूर्ण भरल्या आहेत आणि प्रवेश मिळवण्यासाठी अनेक रुग्ण रांगेत असल्याने व्यवस्थापनावर बराच ताण येत आहे. मात्र, सर्व रुग्णांना सर्वतोपरी सेवा देण्यासाठी आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न करत आहोत.

नागरिक व प्रसारमाध्यमांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच खातरजमा केल्याशिवाय कोणत्याही माहिती प्रसारित करू नये, असे आवाहन रेखा दुबे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.