Chinchwad : मौजमजेसाठी वाहनचोरी करणा-या तिघांना अटक; 12 वाहने जप्त

खंडणी दरोडा विरोधी पथकाची कामगिरी

एमपीसी न्यूज – खंडणी दरोडा विरोधी पथकाने मौजमजेसाठी वाहनचोरी करणा-या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून दुचाकी आणि तीनचाकी अशी एकूण 7 लाख 85 हजार रुपये किमतीची 12 वाहने जप्त केली. या कारवाईमुळे पिंपरी, निगडी, सांगवी, चिखली पोलिस ठाण्यातील एकूण दहा गुन्हे उघडकीस आले आहेत.

प्रविण चंद्रकांत भंडारे (वय 20, रा. संग्राम नगर झोपडपट्टी, निगडी), अमोल उर्फ बाळा अनंत जाधव (वय 19, रा. चिखली), सागर उर्फ लाला चंद्रकांत गगराणी (वय 29, रा. साई चौक पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

  • सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी दरोडा विरोधी पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी पिंपरी-चिंचवड शहरात गस्त घालत होते. पोलीस नाईक निशांत काळे यांना माहिती मिळाली की, ओटास्कीम निगडी येथील अंकुश चौकाच्या कमानीजवळ वाहन चोरी करणारा एक तरुण थांबला आहे. त्यानुसार परिसरात सापळा रचून पोलिसांनी प्रवीण भंडारे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचा मित्र अमोल जाधव याच्यासोबत मिळून दोन ऑटो रिक्षा आणि चार दुचाकी असा एकूण पाच लाख 25 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. या कारवाईमुळे चिखली, निगडी आणि सांगवी पोलीस ठाण्यातील चार गुन्ह्यांची उकल झाली.

दुसऱ्या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बडे यांना माहिती मिळाली की, सागर गगलानी पिंपरी गाव परिसरात फिरत आहे. त्याच्याकडे चोरीची मोपेड दुचाकी आहे. त्यानुसार पोलिसांनी सागर गगलानी याला मोपेड दुचाकीसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या मोपेड दुचाकीबाबत चौकशी केली असता ती चोरीची असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी सागर याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने पिंपरी परिसरातून 2 लाख 60 हजार रुपये किमतीच्या 6 दुचाकी चोरल्याची सांगितले.

  • सागर गगलानी याच्यावर 2012 साली मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. तर चंद्रकांत भंडारे याच्यावर तुळजापूर पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. अटक केलेले आरोपी वाहने चोरून त्यांची विक्री करीत असे. वाहने विकून आलेल्या पैशांचा वापर आरोपी मौजमजेसाठी करत होते.

ही कारवाई पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल कुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बढे, पोलीस उपनिरीक्षक अनिकेत हिवरकर, पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम चाटे, पोलीस कर्मचारी गणेश हजारे, अजय भोसले, अशोक दुधावणे, महेश खांडे, निशांत काळे, शैलेश सुर्वे, उमेश पुलगम, किरण काटकर, आशिष बोडके, नितीन लोखंडे, शरीफ मुलाणी, प्रवीण कांबळे, विक्रांत गायकवाड, सागर शेडगे, गणेश कोकणे, सुधीर डोळस यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.