Chinchwad : महिलेच्या विनयभंग आणि मारहाणप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – महिलेला मारहाण करून तिचा विनयभंग केला. तसेच तिच्या मुलाला मारहाण करून सूनेचाही विनयभंग केला. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 12) रात्री आनंदनगर, चिंचवड येथे घडली.

अमर चव्हाण, भीमराव उर्फ बिरजू म्हस्के, अनिकेत कांबळे (तिघे रा. आनंदनगर, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी 52 वर्षीय महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमर याने फिर्यादी यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच पोटावर लाथा मारल्या. फिर्यादी यांच्याशी गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला. अन्य आरोपींनी फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यांच्या मुलाला मारहाण केली. तसेच फिर्यादी यांच्या सूनेचाही विनयभंग केला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.