Chinchwad : सोशल मिडियावर लहान मुलांचे अश्‍लिल व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड शहरात तीन गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – सोशल मिडियावर अश्‍लिल व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी हिंजवडी, चिंचवड आणि सांगवी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. 3) बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी प्रत्येकी एक गुन्हा दाखल केला आहे. तसेच यापूर्वीही सांगवी पोलीस ठाण्यात अशाच प्रकारचा गुन्हा दाखल केला होता.

पहिली घटना 29 जानेवारी 2019 रोजी चिंचवड येथे घडली. सौरव हलदार या युजर आयडीच्या 9134710699 या मोबाइल धारकाच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

दुसरी घटना 5 मार्च 2019 रोजी सांगवी येथे घडली. दिनेश वैष्णव मोबाइल क्रमांक 8446515519 आणि बिक राम मोबाइल क्रमांक 9091642311 या दोघांच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निकुंभ यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहाय्यक निरीक्षक दत्तात्रय गुळींग याबाबत अधिक तपास करीत आहेत.

तिसरी घटना 1 मे 2019 रोजी हिंजवडी येथे घडली. जशरथ यादव (वय 19) मोबाइल क्रमांक 9325116795 या मोबाईल धारकाच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक कविता रुपनर यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.