BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : किरकोळ कारणावरून तीघांकडून कुटुंबीयास मारहाण

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – किरकोळ कारणावरून तीघांनी कुटुंबीयांना मारहाण केली. ही घटना चिंचवड येथे रविवारी (दि. 2) सांयकाळी सातच्या सुमारास घडली.

केशव गुप्ता (वय 24, रा. दत्तनगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अभिषेक प्रकाश गणगाव (वय 19), रज्जाक मोहम्मद शेख (वय 40) नागेश वाघमारे उर्फ काळ्या (सर्व रा. दत्तनगर, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपापसात संगनमत करुन किरकोळ कारणावरून फिर्यादी, त्यांचा मोठा भाऊ, वडील यांना मारहाण केली, तसेच त्यांना शिवीगाळ केली. यावेळी फिर्यादी यांची आई भांडण सोडवण्यास गेली असता त्यांनाही मारहाण करण्यात आली आहे. या भांडणात आरोपींनी घरातील सामानाची तोडफोड केली. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A4

.