Chinchwad : रस्त्यावर मारामारी, शिवीगाळ केल्याप्रकरणी तिघांना अटक

एमपीसी न्यूज – भररस्त्यात मारामारी आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवारी (दि. 10) रात्री घडली.

वियज विलास गायकवाड (वय 35, रा. मंगळवारपेठ, पुणे), सागर पंढरीनाथ धुमाळ (वय 32, रा. चिंचवड), आणि राजश्री सागर धुमाळ (वय 31, रा. मंगळवारपेठ, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई संतोष मुरलीधर केंगले यांनी फिर्याद दिली.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास आरोपी चिंचवड पोलीस चौकीसमोर सार्वजनिक रस्त्यावर एकमेकांना अश्लील शिवीगाळ आणि मारामारी करत होते. त्यामुळे चिंचवड पोलिसांनी गोंधळ घालणा-या तिघांना बेड्या ठोकल्या. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.