Chinchwad : शिवीगाळ करणा-यास विरोध केल्याने तरुणास लोखंडी रॉडने मारहाण

एमपीसी न्यूज – शिवीगाळ करणा-यास विरोध केल्याने तरुणास लोखंडी रॉडने मारहाण केली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 15) सायंकाळी अजंठानगर, चिंचवड येथे घडली.

गोट्या साबळे (वय 23), नीलेश वक्‍ते (वय 20, दोघेही रा. अजंठानगर, चिंचवड) आणि रितेश (पूर्ण नाव माहिती नाही, रा. शंकरनगर, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सौरभ महादेव वाघमारे (वय 17, रा. अजंठानगर, चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास फिर्यादी सौरभ हे अजंठानगर येथे उभे होते. त्यावेळी तिथे आलेल्या तीन आरोपींनी शिवीगाळ करण्यास सुरवात केली. सौरभ यांनी शिवीगाळ करू नका, असे सांगितले.

या कारणावरून चिडलेल्या आरोपींनी त्यास हाताने व लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. आरोपी गोट्या साबळे याने लोखंडी रॉडने तोंडावर मानेवर मारहाण करून गंभीर जखमी केले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.