Chinchwad : …तोपर्यंत एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद जाईल – अजित पवार

एमपीसी न्यूज – अनुभव नसला, की मी मी म्हणाऱ्याला (Chinchwad) देशाचे पंतप्रधान द्रौपदी म्रुर्मु, राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) प्रश्न निवडणूक आयोगाकडे आहे असे म्हणावे लागते. ते आता अनुभवातून शिकतील. जोपर्यंत शिकतील तोपर्यंत त्यांचे पद जाईल असा टोला विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगाविला.

चिंचवड येथील मुलाखतीत बोलताना अजित पवार म्हणाले, स्वतःचे घरचे काम आहे असे समजून पुणे, पिंपरी -चिंचवड मधील कामे करतो. ती आमची जबाबदारी असते. म्हणून मी सकाळी सहा वाजल्यापासून कामाला सुरुवात करतो. शहरी आणि ग्रामीण असा आम्ही भेद करत नाही.

1999 ते 2014 पर्यंत नगरविकास, गृहनिर्माण हे शहरी भागासंदर्भातील खाते मिळाले नाही. त्यामुळे शहरी भागासाठी निर्णय घेता आले नाहीत. त्यामुळे 2019 मध्ये जाणीवपूर्वक गृहनिर्माण खाते राष्ट्रवादीने घेतले होते. निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी सुरू झाली होती. पण, तोपर्यंत सरकार गडगडले.

सत्ताधारी पक्षाचा पराभव करण्याकरिता विरोधकांची मते एकत्रित राहिली पाहिजे. मतांची विभागणी न झाल्यास काय होते हे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत दिसले. रविंद्र धंगेकर निवडून (Chinchwad) आले. चिंचवडमध्ये बंडखोरी झाली नसती तर महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला असता.

विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीमध्ये समन्वय ठेवून महाविकास आघाडीने जागा वाटप केले तर वेगळे चित्र पहायला मिळेल. यापुढील काळात आघाड्यांचेच सरकार चालेल. आता कोणत्याही एका पक्षाचे सरकार येण्याची शक्यता कमी आहे.

राजकीय आकसातून कोणाच्या चौकशा करू नये. आम्ही सरकारमध्ये असताना जाणीवपूर्वक कोणाला त्रास दिला. जाणीवपूर्वक केलेल्या गोष्टी फारकाळ टिकत नाहीत. मी काय करतो हे बघण्यापेक्षा माझ्या विचाराचे जास्त आमदार निवडून द्यावेत, असेही पवार म्हणाले.

Pune : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर एकही बालविवाह न होण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे आवडते आहेत असे विचारले असता उद्धव ठाकरे असल्याचे क्षणात सांगितले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यास 100 टक्के आवडेल असे सांगत आवडते नेते शरद पवारसाहेब असल्याचेही पवार यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.