Chinchwad : वादळी पावसात पिंपरी चिंचवड शहरात 14 ठिकाणी झाडे पडली 

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात गुरुवारी (दि. 16) सायंकाळी वादळी (Chinchwad )  वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. यामध्ये शहरातील विविध भागांमध्ये 14 ठिकाणी झाडे पडली. तर मोशी येथे एक होर्डिंग कोसळले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

 

पिंपरी चिंचवड अग्निशमन विभागाला सायंकाळी तीन वाजून 58 मिनिटांनी कुदळवाडी चिखली येथे झाड पडल्याची पहिली वर्दी मिळाली. त्यानंतर काही मिनिटांमध्ये पांजरपोळ भोसरी येथून दुसरी वर्दी मिळाली. त्यानंतर सावित्रीबाई फुले उद्यान सुदर्शन नगर चिंचवड, पिंपरी गावातील पवनेश्वर मंदिर, मोरवाडी चौक पिंपरी, बोऱ्हाडेवाडी रोड मोशी, प्रेम लोक पार्क चिंचवड येथील उद्यानातील मोठे झाड पडले.

PCMC : शहरातील अधिकृत होर्डिंगच्या मजबुतीकरणाचा प्रश्न गंभीर; आजपर्यंत किती पडले होर्डिंग?

 

संतनगर मोशी, इंद्रायणीनगर भोसरी, आंबेडकर पुतळा दापोडी, चिंचवड डीमार्ट जवळ, आरटीओ ऑफिस जवळ मोशी, सेक्टर 12 भोसरी, जलवायू विहार सेक्टर 7 स्पाईन रोड, कुदळवाडी चिखली येथेही झाडे पडण्याच्या घटना घडल्या. याबाबत वर्दी मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत झाडे बाजूला केली. काही ठिकाणी रस्त्यावर झाडे पडल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. जवानांनी तात्काळ झाडे हटवून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली.

 

मोशी येथे रस्त्याच्या बाजूला असलेले होर्डिंग वादळी वाऱ्यामुळे कोसळले. या होर्डिंगखाली काही वाहने अडकली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र वाहनांचे मोठे नुकसान (Chinchwad ) झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.