Chinchwad : श्री फत्तेचंद जैन विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांकडून पुलवामा येथील शहीद जवानांना श्रद्धांजली

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील श्री फत्तेचंद जैन विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांकडून पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

चिंचवडमधील चापेकर चौकात झालेल्या या श्रद्धांजली सभेचे आयोजन विद्यालयाचे माजी विद्यार्थी अमित तलाठी, सचिन चाकोरे, महेश वर्मा, गोविंद वर्मा यांनी केले. श्रद्धांजली सभेसाठी आजी माजी नगरसेवक, परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

गुरुवारी (दि. 14) पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय सैन्य दलातील 42 जवान शहिद झाले. आजवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील हा सर्वात मोठा हल्ला होता. देशभर या घटनेचा विविध स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.