chinchwad : संत तुकाराम महाराज पालखीचे चिंचवडगाव मार्गे देहुत प्रस्थान

एमपीसी न्यूज – गेले अनेक वर्षांपासून खंडित झालेली “काकड आरती” ची परंपरा यावर्षी पुन्हा जोमात चालु करण्यात आली. चिंचवड येथे संत तुकाराम महाराज पालखीचे चिंचवडगाव मार्गे देहुत प्रस्थान झाले. गेल्या महिनाभर सुरु असलेली काकड आरतीने त्याची सांगता झाली. त्यानंतर उत्साहाच्या वातावरणात दिंडी आणि मिरवणूक झाली त्यामध्ये तरुण , ग्रामस्थ आणि महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.

ह.भ.प. गायनाचार्य मधुकर महाराज ढाले आणि त्यांना मृदुंगनाथ शिंदे महाराज यांची साथ लाभली. त्याचबरोबर ज्येष्ठ कीर्तनकार गुरुवर्य ह.भ.प. शंकर महाराज शेवाळे यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. आणि ह.भ.प.मधुकर महाराज मोरे दादा आणि त्यांच्या सहकार्‍यांचे काल्याचे सुश्राव्य असे कीर्तन झाले आणि या महिनाभराच्या “काकड आरतीची” सांगता झाली. आणि दुपारी 12 वाजल्यानंतर महाप्रसादाचे वाटप झाले.या “काकड आरती” सोहळ्यासाठी विशेष परिश्रम श्री काळभैरवनाथ उत्सव समिती तसेच ग्रामस्थ आणि चिंचवडगांवातील भजनी मंडळांचे सहकार्य लाभले.त्यानिमित्त ग्रामस्थ आणि तरुणांनी असा संकल्प सोडला की, ही परंपरा यापूढेही अखंडीत चालू राहिल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.