Chinchwad : ‘मोका’च्या गुन्ह्यातील दोन फरार आरोपींना कराडमधून अटक

एमपीसी न्यूज – ‘मोका’च्या गुन्ह्यात फरार असलेल्या दोन आरोपींना सातारा जिल्ह्यातील कराड येथून अटक केली. ही कारवाई पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडाविरोधी पथकाने केली.

विकास ऊर्फ बाळ्या गोपाळ लोखंडे (वय 22, रा. काळाखडक झोपडपट्टी, वाकड), ताजुद्दीन ऊर्फ ताज बद्रुद्दिन शेख (वय 25, रा. म्हातोबा मंदिराजवळ काळाखडक झोपडपट्टी वाकड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोकाची कारवाई केलेले दोन फरार गुन्हेगार सातारा जिल्ह्यातील कराड येथे असल्याची माहिती पोलीस नाईक आशिष बोडके आणि गणेश हजारे यांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी कराड येथून हरून बद्रुद्दिन नाईक पठाण यांच्या घरातून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

आरोपी विकास लोखंडे याच्यावर हिंजवडी, खडकी आणि वाकड पोलीस ठाण्यात चार गुन्ह्यांची नोंद आहे. तर आरोपी ताजुद्दीन शेख याच्यावर वाकड पोलीस ठाण्यात दोन गुन्ह्यांची नोंद आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या दोघांवर ‘मोका’ची कारवाई केली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सहपोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उपनिरीक्षक अनिकेत हिवरकर, पोलीस कर्मचारी गणेश हजारे, अशिष बोटके, निशांत काळे, उमेश पुलगम, किरण काटकर, सागर शेडगे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.