Chinchwad : चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या दोन आरोपींना खंडणी दरोडाविरोधी पथकाकडून अटक

एमपीसी न्यूज – जबरी चोरी, दरोडा अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून फरार असलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या खंडणी, दरोडाविरोधी पथकाने बेड्या ठोकल्या. सोमवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.

शाहनवाज इरफाकत सय्यद (वय 24) आणि निखिल विठ्ठल राजमाने (वय 20 दोघेही रा. ओटा स्किम, निगडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी निशांत काळे, प्रविण काबळे व आशिष बोटके यांना त्यांचे आरोपींबाबत माहिती मिळाली. पोलिसांनी अंकुश चौक, निगडी येथे सोमवारी दुपारी सापळा रचून त्या दोघांना अटक केली. आरोपी शाहनवाज याच्यावर निगडी पोलीस ठाण्यात जबरी चोरी, देहूरोड पोलीस ठाण्यात चोरी आणि जबरी चोरी तसेच पिंपरी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे. तसेच आरोपी निखील राजमाने याच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात मारहाण करून लुटमार करणे, असा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींचा पोलीस शोध घेत होते.

ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप विष्णोई, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्य आयुक्‍त आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी, दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, उपनिरीक्षक अनिकेत हिवरकर, पोलीस कर्मचारी अजय भोसले, निशांत काळे, प्रविण कांबळे, आशिष बोटके, विक्रांत गायकवाड, उमेश पुलगम व आशिष बनकर यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.