Chinchwad : मंदिरात चोरी करणा-या दोघा भावांना अटक

एमपीसी न्यूज – शहरातल्या विविध मंदिरातून दानपेट्या आणि ऐवज लांबवणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना अटक करण्यात आली. ही कारवाई खंडणी दरोडाविरोधी पथकाने केली. त्यांच्याकडून चार गुन्हे उघडकीस आले असून 42 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

विशाल रमेश भालेराव (वय 27) आणि अजय रमेश भालेराव (वय 22, दोघेही रा. लालटोपीनगर, मोरवाडी) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मंदीराच्या दानपेट्या फोडून ऐवज लांबवणारे सराईत चोरटे भोसरीतील गवळी माथा येथील पाण्याच्या टाकीजवळ थांबले असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बढे यांना मिळली. त्यानुसार पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी शहरातील चार मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली.

  • त्यांच्याकडून भोसरी, निगडी, चिखली व पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दानपेटीतील चोरलेली रक्कम तसेच पितळी नाग व उंदीर असा सर्वमिळून एकूण 41 हजार 935 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ही कारवाई खंडणी दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर असपत, पोलीस उप निरीक्षक विठ्ठल बढे, पुरूषोत्तम चाटे, कर्मचारी अजय भोसले, अशोक दुधावणे, राजेंद्र शिंदे, उमेश पुलगम, किरण काटकर, प्रदिप गोडांबे, सागर शेडगे, सुधीर डोळस, नितीन खेसे, प्रविण माने यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.