Chinchwad : ‘संचारबंदी’त अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या दोघांना दहा हजारांचा दंड

एमपीसी न्यूज – संचारबंदी सुरू असताना अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या दोघांना पुणे प्रथमवर्ग न्यायदंडाधिका-यांनी दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. या  दोघांनी वाकड परिसरात अवैध प्रवासी वाहतूक केली होती.

संतोष नामदेव पांडे, रामदयाल फत्तेनारायण पांडे यांच्यावर दंड ठोठावण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी याबाबत माहिती दिली. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान परवानगी शिवाय तसेच जीवनावश्यक वस्तू व सेवांशिवाय वाहतूक करण्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत. असे असताना आरोपींनी वाकड परिसरात अवैधरित्या प्रवासी वाहतूक केली.

याबाबत दोघांवर वाकड पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 188, 269, 270, 271, 290 तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना कलम 11 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांना आज, सोमवारी (दि. 30) न्यायालयात हजर केले असता पुणे प्रथमवर्ग न्यायदंडाधिका-यांनी दोघांना प्रत्येकी पाच हजार असा एकूण दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.