Chinchwad : देणेक-यांच्या तगाद्याला कंटाळून दोन बहिणींनी केले विषप्राशन; एकीचा उपचारादरम्यान मृत्यू

एमपीसी न्यूज – देणेकऱ्यांनी लावलेल्या पैशाच्या तगाद्याला कंटाळून दोन सख्या बहिणींनी विषप्राशन केले. उपचार दरम्यान एकीचा मृत्यू झाला. ही घटना कृष्णानगर, चिंचवड येथे घडली.

मंगल गोकुळ नार्वेकर (वय 62) आणि अलका राजू बाबर (वय 45, दोघीही रा. जीमगेश बिल्डिंग, कृष्णानगर, चिंचवड) असे विष प्राशन केलेल्या दोघी बहिणींची नावे आहेत. यापैकी मंगल नार्वेकर यांचा रविवारी उपचार दरम्यान मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगल आणि अलका या दोघी बहिणींकडे काही जणांचे पैसे उधार होते. ते पैसे देण्यासाठी देणेक-यांनी तगादा लावला. सततच्या या त्रासाला कंटाळून दोघींनी बुधवारी (दि. 6) सकाळी विषारी औषध प्राशन केले. यामुळे त्यांना तात्काळ उपचारासाठी पिंपरी मधील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले. मात्र मंगल नार्वेकर यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.