Chinchwad : बावधन व चिंचवडमधून दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – बावधन व चिंचवड येथून पार्क केलेल्या (Chinchwad) दुचाकी अज्ञातांनी चोरून नेल्या आहेत. या चोरीच्या घटना शुक्रवारी (दि.27) व शनिवारी (दि.28) घडली आहे.

पहिल्या घटनेत बावधनमधील त्रिमूर्ती चौकातून अज्ञातांनी दुचाकी चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. 27) सकाळी उघडकीस आली. संदीप धोंडिबा आखाडे (वय 40, रा. बावधन खुर्द) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आखाडे यांनी त्यांची 10 हजारांची दुचाकी गुरुवारी (दि. 26) रात्री दहा वाजता त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली. रात्रीच्या वेळी अज्ञातांनी आखाडे यांची दुचाकी चोरून नेली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Nigdi : यमुनानगर येथे खिडकीची ग्रील उचकटून घरफोडी

तर चिंचवड येथील कृष्णानगर येथील सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली (Chinchwad) दुचाकी अज्ञातांनी चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 28) घडली. विनय संभाजी देशमुख (वय 29, रा. कृष्णानगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची दुचाकी शुक्रवारी (दि. 27) रात्री अकरा वाजताच्या सुमारास त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली. रात्रीच्या वेळी त्यांची दुचाकी चोरीला गेली. शनिवारी सकाळी नऊ वाजता हा प्रकार उघडकीस आला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.