BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : किरकोळ कारणावरून दुचाकीस्वाराला मारहाण; तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – एका टपरीवर चहा पिऊन दुचाकीवरून घरी जात असलेल्या तरुणाला तिघांनी मिळून रस्त्यात अडवून मारले. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी (दि. 10) रात्री दहाच्या सुमारास लिंक रोड, पत्राशेड येथे घडली.

महेश दत्तात्रेय साळवे (वय 22, रा. पत्रा शेड, लिंक रोड, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आकाश दिलीप मगर, नरु ऊर्फ किश्या तांबे, छोटू शेख (सर्व रा. पत्रा शेड, लिंक रोड, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश सोमवारी रात्री दहाच्या सुमारास पत्राशेड, लिंक रोड येथे एका टपरीवर चहा पिऊन दुचाकीवरून घरी जात होते. त्यावेळी नरू याने त्यांना लाकडाच्या वखारीजवळ अडवले. आकाश याला दोन दिवसांपूर्वी का बोललास? अशी विचारणा करत तिघांनी मिळून महेश यांना लाकडाच्या वखारीमधील लाकडांनी मारहाण केली. यामध्ये महेश यांच्या डोक्याला आणि हातापायाला गंभीर इजा झाली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.
.