Chinchwad : अक्षरमुद्रणातून रेखाटलेल्या अमिताभ बच्चन यांच्या 77 छायाचित्रांचे आजपासून प्रदर्शन

एमपीसी न्यूज- महानायक अमिताभ बच्चन यांच्या 77 व्या वाढदिवसानिमित्त अंशुल क्रिएशनच्या वतीने अक्षरमुद्रणातून चितारलेल्या त्यांच्या ७७ छायाचित्रांचे प्रदर्शन आज, शुक्रवारपासून भारतात प्रथमच चिंचवड येथे भरत आहे.

11 ऑक्टोबर या अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेआहे. चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे कलादालनात 14 ऑक्टोबरपर्यंत हे प्रदर्शन सर्वांना विनामूल्य पाहता येणार आहे. चिंचवड येथील श्रृती गणेश गावडे या तरुणीने अक्षरमुद्रणातून (Typographic illustration) ही छायाचित्रे रेखाटली आहेत.

अमिताभ यांच्या गाजलेल्या सिनेमांची नावे सूक्ष्म अक्षरात लिहून ही सारी चित्रे तिने काढली आहेत. अंशुल क्रिएशनचे विजय जगताप यांनी या प्रदर्शनाच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.