Chinchwad: एम्पायर इस्टेटवासियांना अनधिकृतपणे होणा-या पार्किंगचा नाहक त्रास; पालिकेचे दुर्लक्ष

एमपीसी न्यूज – जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील एम्पायर इस्टेट सोसायटीमधील नागरिकांना अनधिकृतपणे पार्किंग केलेल्या वाहनांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिसरातील दुकानामंध्ये खरेदी करायला आलेले नागरिक बेकायदेशीरपणे रस्त्यावर वाहने पार्क करतात. या ठिकाणी पोलीस देखील उपलब्ध नसतात. आपत्कालीन परिस्थितीत अग्निशामक दलाच्या वाहनांना येण्यासाठी जागा देखील नसते. त्यामुळे पालिकेने बेकायदेशीर पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी एम्पायर इस्टेट व्यापारी संघटनेचे अध्यक्ष हरिश ललवानी यांनी केली आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ललवानी यांनी म्हटले आहे की, एम्पायर इस्टेटमध्ये 1800 सदनिका आहेत. या परिसरात मोठ-मोठे मॉल तसेच सणासुदीच्या दिवशी मोठी बाजारपेठ भरते. त्यामुळे या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी होती. खरेदीला आलेले नागरिक अस्ताव्यस्तपणे रस्त्यांवर वाहने पार्क करतात. याठिकाणी पोलीस देखील नसतात. आपत्कालीन परिस्थितीत अॅम्ब्युलन्स, अग्निशामक इत्यादींना जाण्यासाठी देखील जागा नसते. त्यामुळे महापालिकेने याकडे गांभीर्याने पाहून बेकादेशीरपणे वाहने पार्क होऊ देऊ नयेत.

याबाबत पालिकेकडे वारंवार तक्रार केली. परंतु, महापालिका आयुक्त त्याकडे दुर्लक्ष करत आहे. एम्पायर इस्टेटवासियांचे म्हणने ऐकून न घेता केवळ कारणे दिली जातात, असा आरोपही त्यांनी केला. तसेच एम्पायर इस्टेट सोसायटीमधून जात असलेल्या नव्या पुलाचा चढ-उतार (रॅम्प)चे काम पालिकेने सुरु केले आहे. त्यामुळे देखील नागरिकांना त्रास होत आहे. सोसायटील लोकांना केवळ 5.5 मीटरचा सेवारस्ता ठेवण्यात आला होता. 10 हजार लोकसंख्या असलेल्या सोसायटीला 5.5 मीटरचा सेवारस्ता हा अतिशय लहान आहे.

सध्या एम्पायरमधून चिंचवड चौकात जाण्यासाठी 20 ते 25 मिनिटे लागतात. रॅम्पवरील वाहतुक सुरु झाल्यास रहिवाशांना चिंचवड चौकात पोहचण्यास किमान 45 मिनिटे लागणार आहेत. रॅम्पमुळे एम्पायरमध्ये येण्यासाठी रहिवाशांना मोठा वळसा घालून यावे लागणार आहे, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.