Chinchwad: युनिक व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूलचा सलग दुसऱ्या वर्षी 100 टक्के निकाल

Chinchwad: Unique Vision English Medium School's 100 percent result for the second year in a row चिंचवड येथील युनिक व्हिजन इंग्लिश मीडियम शाळेच्या दहावीच्या विद्यार्थ्यांची ही दुसरी बॅच होती.

एमपीसी न्यूज- माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा बुधवारी (दि.29) ऑनलाइन निकाल जाहीर झाला असून चिंचवड येथील युनिक व्हिजन इंग्लिश मीडियम शाळेचा 100 टक्के निकाल लागला आहे. शाळेने सलग दुस-यावर्षी 100 टक्के निकालाची पंरपरा कायम राखली आहे.

या शाळेतील तीन विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळविले आहेत. सुप्रिया नलावडे या विद्यार्थीनीने 91.08 टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक मिळविला. तर ऋतुजा केळकर हिने 91.06 टक्के गुणांसह द्वितीय आणि दर्शन हिंगणे हिने 90.02 गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.

चिंचवड येथील युनिक व्हिजन इंग्लिश मीडियम शाळेच्या दहावीच्या विद्यार्थ्यांची ही दुसरी बॅच होती. मागीलवर्षी या शाळेचा शंभर टक्के निकाल लागला होता. यंदाही 100 टक्के निकालाची पंरपरा कायम राखली आहे.

सलग दुस-यावर्षी शंभर टक्के निकाल लागल्याने शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालकांचे संस्थेचे अध्यक्ष गजानन चिंचवडे यांनी अभिनंदन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.