Chinchwad : घरफोडी करून सोन्याचे दागिन्यासह रोकड लंपास

एमपीसी न्यूज – घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 70 हजार 400 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. हा प्रकार रविवारी (दि. 19) सकाळी साडेनऊच्या सुमारास चिंचवड येथे उघडकीस आला.

अल्पेश लालचंद सोलंकी (वय 38, रा. ज्वेल स्क्वेअर अपार्टमेंट, एमआयडीसी ऑफिस समोर, चिंचवड) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोलंकी यांचे घर शुक्रवारी दुपारी तीन वाजल्यापासून रविवारी सकाळपर्यंत कुलूप लावून बंद होते. दरम्यान अज्ञात चोरट्याने दरवाजाचा कडीकोयंडा कापून घरात प्रवेश केला.

घरातील लोखंडी कपाटाचे लाॅक तोडून 70 हजार 400 रुपये किमतीचे 28 ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. फिर्यादी सोलंकी रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.